नमस्कार मी स्वप्नील शिंदे, आणि www.marathibusinessideas.com या आमच्या वेबसाइट/ ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे.
जर तुम्ही देखील व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल पण नेमका कोणता व्यवसाय करावा असा विचार जर तुमच्या डोक्यात येत असेल तर www.marathibusinessideas.com हि वेबसाईट तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.
या वेबसाईट किंवा ब्लॉग वर तुम्हाला सर्व प्रकारच्या बिजनेस आयडिया अगदी मराठी भाषेत मिळतील.
या ब्लॉग ची सुरुवात करण्याचे कारण
मी जेव्हा डिग्री च्या शेवटच्या वर्षात होतो तेव्हा माझ्या हे पूर्ण लक्षात आलं होत की जर माझे आणि माझ्या कुटुंबाचे सर्व स्वप्न मला पूर्ण करायचे असतील तर बिजनेस करूनच ते होऊ शकत.
मी अगदी तेव्हापासूनच बिजनेस करायचे स्वप्न रंगवत होतो.
यशस्वी व्यावसायिकांच्या Success Story वाचून खूप भारी वाटायचं
कशा प्रकारे एका व्यक्तीने शून्यातून सुरुवात करून आज करोडोंचा व्यवसाय उभा केला
- कोणी महिन्याला १ लाख कमावतंय
- कोणी महिन्याला १० लाख कमावतंय
- कोणी ५० करोड चा टूर्नओव्हर करतय
- कोणी मोठ्या गाडीत फिरतंय
- कोणी सूट बूट घालून अगदी थाटात फिरतंय
आलिशान घर, गाडी, जमीन – जुमला, मान- सन्मान, स्वतःची आणि परिवाराची सुरक्षा, भरपूर स्वातंत्र्य असलेलं आणि आपण स्वप्नात बघतो अगदी तस त्यांचं आयुष्य ! एकदम भारी
परंतु जेव्हा माझं डिग्री च शिक्षण पूर्ण झालं आणि घरच्यांनी मला विचारलं कि “ पुढे काय करायचं आहे ?”
त्यावेळेस मी अगदी जोशात म्हटलो की “मला बिझनेस करायचा आहे”
बिजनेस म्हटल्यावर आपल्या घरच्यांची Reaction कशी असते हे तर तुम्हाला माहीतच असेल.
सगळ्या आई वडिलांप्रमाणे त्यांची देखील इच्छा होती की मी एखादी सरकारी नोकरी करावी आणि नाहीच जमलं तर एखाद्या खाजगी कंपनी मध्ये जॉब करावा.
पण मी एकदम ठाम होतो की मला बिझनेसच करायचा आहे, काहीही झालं तरी!
बिझनेस करायचा आहे हे मी त्यांना म्हटलो खर पण नेमका कोणता बिजनेस करावा असा प्रश्न माझ्यापुढे उभा होता.
मग मी काही बिजनेस आयडिया शोधण्याचा प्रयत्न केला आणि एक ४ ते ५ बिजनेस आयडिया मला सापडल्या.
पण त्या बिजनेस आयडिया मध्ये काही ना काही अडचण होती.
त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं कि मला अजून बिझनेस आयडिया शोधाव्या लागतील.
आता हे बोलणं खूप सोपं होत पण प्रयत्न करून देखील मला चांगल्या बिजनेस आयडिया सापडत नव्हत्या.
अशे अनेक महिने, अशा अनेक रात्री असतील ज्या मी जागून काढल्या आहे. भविष्याच्या चिंतेने रात्री झोप येत नसायची.
आयुष्यात एखादा चांगला बिजनेस कधी सापडलं की नाही का आयुष्यभर एखादी न आवडणारी नोकरीच मला करावी लागलं अशी चिंता मला सतावत होती.
अपयश, अपयश आणि फक्त अपयश
प्रचंड स्ट्रेस आणि टेन्शन, कधी कधी असं वाटायचं कि बस झालं आता, नाही सहन होत हे टेन्शन ! डोक्याचा पार भुगा झाला आहे. असं वाटायचं की काही विचारच करू नये
परंतु एक विचार माझ्या डोक्यात आला –
कितीही वेळा अपयश आलं, कितीही अडचणी आल्या तरी देखील जर फक्त १ यश मला मिळालं तर सगळं काही बदलून जाईल
आणि म्हणूनच मी हार न मानता लढत राहिलो. नवनवीन बिझनेस आयडिया शोधत राहिलो.
हजारो व्हिडिओ, आर्टिकल्स, रिपोर्टचा अभ्यास केला, वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग, जाहिरात करून बघितली, हजारो वेगवेगळे प्रयोग करून बघितले.
मागील ६ वर्षात मी ८ ते ९ वेगवेगळे बिजनेस केले आणि हळू हळू माझ्या लक्षात यायला लागलं कि चांगल्या बिजनेस आयडिया कशा पद्धतीने शोधायच्या.
या ठिकाणी माझ्या असं देखील लक्षात आल कि माझ्याप्रमाणेच इतरांना देखील बिझनेस आयडिया सापडत नाहीये आणि म्हणूनच मी या ब्लॉग ची सुरुवात केली.
या ब्लॉग वर मी सर्व प्रकारच्या बिजनेस आयडिया ची माहिती मराठी भाषेत देणार आहे.
माझ्याकडे अगदी भरपूर बिजनेस आयडिया आहे, अगदी तुम्हाला वाचून कंटाळा येईल एवढ्या !